अधिक किंवा ‘पुरुषोत्तम मासा’चे महत्त्व, या काळात करावयाची व्रते आणि पुण्यकारक कृती अन् ती करण्यामागील शास्त्र !
या वर्षी १८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात अधिक मास आहे. हा अधिक मास ‘अधिक आश्विन मास’ आहे. अधिक मासाला पुढच्या मासाचे नाव देतात, उदा. आश्विन मासापूर्वी येणार्या अधिक मासाला ‘आश्विन अधिक मास’ असे संबोधतात आणि नंतर येणार्या मासाला ‘निज आश्विन मास’ म्हणतात.