सुरक्षारक्षकांचे प्रश्‍न न सोडवल्यास सिंधुदुर्गात मंत्र्यांच्या गाड्या अडवू ! – महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक एकता समितीची चेतावणी  

महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक एकता समितीच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांच्या प्रश्‍नांविषयी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

एस्.टी.च्या साडेचार सहस्र वाहक-चालकांच्या नोकरीवरील तात्पुरती स्थगिती उठवली

राज्य परिवहन महामंडळात २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत भरती झालेले चालक आणि वाहक यांच्या सेवेस दिलेली तात्पुरती स्थगिती उठवली आहे. एस्.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी हा आदेश काढला आहे.

कोलगाव येथील कोकण कॉलनीत अवैधरित्या बसवलेली सी.सी.टी.व्ही. यंत्रणा अखेर पोलिसांच्या नियंत्रणाखाली

कोलगाव येथील कोकण कॉलनीत अवैधरित्या बसवण्यात आलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे काढण्यात यावेत, यासाठी स्वराज्य चौक मित्रमंडळाने आवाज उठवला होता.

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना कर्ज घेणे शक्य होणार

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामस्थांचा मालकीहक्क दर्शवणार्‍या मालमत्ता कर आकारणीपत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करणारा शासननिर्णय रहित केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात पत्रकारांसाठी ४० राखीव खाटा

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात पत्रकारांसाठी ४० राखीव खाटा ठेवण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे. पत्रकारांना योग्य उपचार आणि सुविधा मिळण्यासाठी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित बांगर आणि सहआयुक्त सुजाता ढोले-पाटील यांची भेट घेतली.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निवेदनाची नोंद घेत जिल्हा प्रशासनाने प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सोपवले

चिपळूण येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी नगरपरिषदेने श्री गणेशमूर्ती जमा करणे आणि विसर्जन याअंतर्गत श्री गणेशमूर्तींची कचर्‍याच्या गाड्यांमधून वाहतूक करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. भा.दं.वि. २९५ (अ) अन्वये धार्मिक भावना दुखावणे, हा दंडनीय अपराध आहे.

चीनसमवेत पाकनेही दुःसासह केले, तर त्याला प्रचंड हानी सोसावी लागेल ! – संरक्षणदलप्रमुख जनरल बिपिन रावत

अलीकडच्या काळात चीनच्या काही आक्रमक कारवाया भारताच्या दृष्टीस पडत आहेत; मात्र त्यांना अतिशय अनुरूप रितीने तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत. जर पाकने चीनसमवेत सीमेवर चालू असलेल्या भांडणाचा अपलाभ उठवण्याचे दु:साहस करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला प्रचंड हानी सोसावी लागेल.

अशासकीय संस्थांनी दान घेतलेल्या गणेशमूर्तींची विक्री करण्याची अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी

पुणे महानगरपालिकेने राबवलेला मूर्तीदान (गणेशमूर्ती संकलन) उपक्रम म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचाच प्रकार असल्याचे उघड झाले असून या संदर्भात ३१ ऑगस्ट या दिवशी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन समितीने तिची भूमिका जाहीर केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत सांगली जिल्ह्यात विविध माध्यमांद्वारे व्यापक समाजप्रबोधन

कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष संपर्क जरी करता येत नसले, तरी जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीने सामाजिक माध्यमांचा वापर करून गणेशोत्सवाच्या काळात व्यापक समाज प्रबोधन केले.

सनातनचे साधक श्री. नीलेश नागरे यांचा विविध आस्थापनांच्या वतीने ‘कोविड योद्धा’, ‘कर्मवीर २०२०’ पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन सत्कार 

महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण आस्थापनाध्ये उपकार्यकारी अभियंता म्हणून श्रीरामपूर विभागीय कार्यालयात कार्यरत असलेले सनातनचे साधक श्री. नीलेश सहदेव नागरे यांचा सत्कार करण्यात आला.