चीनसमवेत पाकनेही दुःसासह केले, तर त्याला प्रचंड हानी सोसावी लागेल ! – संरक्षणदलप्रमुख जनरल बिपिन रावत

पाकने चीनसमवेत सीमेवर चालू असलेल्या भांडणाचा अपलाभ उठवण्याचे दु:साहस करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला प्रचंड हानी सोसावी लागेल, अशी चेतावणी संरक्षणदलप्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला उद्देशून दिली.

विविध मागण्यांसाठी शिक्षकदिनी शिक्षकांची कोल्हापूर, सांगली ते बारामती दिंडी

राज्यातील सर्व घोषित, अघोषित शाळा आणि तुकड्या यांना प्रचलित नियमानुसार अनुदान वितरणाचा शासन निर्णय तातडीने घोषित व्हावा, विनाअनुदानित आणि टप्पा अनुदानित शिक्षक अन् शिक्षकेतर बांधव यांना २० टक्के आणि त्यापुढील वेतन चालू व्हावे, या मागण्यांसाठी कोल्हापूर, सांगली ते बारामती, अशी पायी दिंडी काढण्यात आली.

पालकमंत्री जनतेची दिशाभूल करत असल्याविषयी भाजयुमोची निदर्शने ! 

पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत सध्या जिल्ह्यात ७३ अतीदक्षता, ३१० ‘ऑक्सिजन’ आणि प्रथमोपचार खाटा असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाच्याच ‘कॉल सेंटर’मध्ये चौकशी केली असता एकही खाट नसल्याचे सांगण्यात आले.

सातारा येथे पत्रकारांसाठी ‘कोविड केअर सेंटर’ चालू करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीतही जीव धोक्यात घालून पत्रकार सेवा कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे पत्रकारांसाठी स्वतंत्र ‘कोविड केअर सेंटर’ची उपलब्धता करावी आणि वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी सातारा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.

प्रवासी आणि माल वाहतूक करणारी वाहने अधिकोष आणि ‘फायनान्स’ आस्थापनांकडे जमा करणार 

कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी शासनाने दिलेली मुदत ऑगस्टमध्ये संपली. कोरोना मात्र अजूनही संपलेला नाही. त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक करणारे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील २ व्यापारी आणि स्वस्त धान्य दुकान चालक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये सामान्य आणि गरीब जनतेसाठी केंद्र आणि राज्य शासन यांनी दिलेले स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती समजताच पोलिसांनी वैराग आणि बार्शी येथे धाड टाकून लाखो रुपयांचा गहू आणि तांदूळ जप्त केला होता.

कन्नूर (केरळ) येथे बॉम्ब बनवतांना झालेल्या स्फोटात माकपचे कार्यकर्ते घायाळ

कन्नूर (केरळ) – येथील पोन्नियम भागामध्ये झालेल्या बॉम्बच्या स्फोटात काही जण घायाळ झाले. घायाळ झालेले लोक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असून ते येथे बॉम्ब बनवत असतांना स्फोट झाल्याने घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी काही ‘स्टील बॉम्ब’ जप्त केले आहेत.

बारपेटा (आसाम) येथे धर्मांधाने प्राचीन मठामध्ये तोडफोड करून श्रीमद्भगवद्गीता जाळली

बारपेटा (आसाम) – येथील गनक कुची गावातील प्राचीन वैष्णव मठामध्ये तोडफोड करणे, श्रीमद्भगवद्गीता जाळणे, मठातील साहित्य बाहेर आणून जाळणे, गुरूंच्या आसनाची तोडफोड करून मठाला अपवित्र करणे, यांप्रकरणी पोलिसांनी रफीकुल अली याला अटक केली आहे.

(म्हणे) ‘भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये चांगले संबध असण्यासाठी हिंदु धर्म आधार होऊ शकत नाही !’ – नेपाळ

भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये मोठ्या संख्येने हिंदु धर्मीय रहातात. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध असण्यासाठी धर्माचा आधार होऊ शकत नाही. धर्माचा देशांतर्गत गोष्टींसाठी आणि दुसर्‍या देशासमवेत चांगले संबंध असावेत यासाठी वापर होता कामा नये

शांतता निर्माण करायची असल्यास आक्रमणाला प्रोत्साहन देऊ नये ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला सुनावले

शांतता निर्माण करायची असल्यास आक्रमणाला प्रोत्साहन न देता परस्परांवर विश्‍वास असणे आवश्यक असून त्यामुळेच शांतता कायम राहू शकते.