कोरोनाच्या निरुत्साहाच्या काळात महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी ‘ऑनलाईन’ उखाणे स्पर्धा

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या निरुत्साहाच्या काळात महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी गौरी-गणपती सणानिमित्त महिला बचत गटातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने ‘ऑनलाईन’ उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘विचारवंतांच्या हत्येचे अन्वेषण करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक नेमावे !’

पुरोगामी मार्क्सवाद्यांनी हिंदूंचे शेकडो बळी आतापर्यंत घेतले आहेत, ही स्थिती चिंताजनक वाटत नाही का ? त्या तुलनेत ४ पुरोगाम्यांच्या हत्यांवर अशा प्रकारे कांगावा करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच होत ! यातून केवळ हिंदुद्वेषापोटीच अशा प्रकारची याचिका करण्यात आली आहे, हे लक्षात येते !

पुण्यात पोलिसांची विविध ठिकाणी नाकेबंदी, शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या योजनेचे आसखेड खुर्द (तालुका खेड) क्षेत्रात चालू असलेले काम भामा आसखेड धरणग्रस्तांनी २७ ऑगस्ट या दिवशी बंद पाडले होते. त्यानंतर ते पुन्हा चालू झाले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंद रहाणार 

कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने येथील श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंद असणार आहे, असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात आता प्रत्येक रविवारी जनता ‘कर्फ्यु’ !

धाराशिव जिल्ह्यात भाजीपाला किराणा दुकानांसह अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत चालू रहाणार आहेत, तर औषधालये २४ घंटे चालू रहाणार आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यात आता प्रत्येक रविवारी जनता ‘कर्फ्यु’ रहाणार आहे

(म्हणे) ‘भारताची वर्ष १९६२ पेक्षा अधिक मोठी हानी करू !’ – चीनच्या सरकारी वर्तमानपत्रातून धमकी

भारताने चीनच्या सैन्याच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडल्यावर हे संपादकीय लिहिण्यात असून त्यातून भारतावर टीका करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘सीमावादाला भारतच उत्तरदायी !’ – चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा कांगावा

चीनसमवेतच्या सीमावादाला भारतच उत्तरदायी आहे, असा आरोप चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी केला आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते. ‘वादग्रस्त सीमारेषेवर स्थिरता राखण्यासाठी चीन बांधील आहे’, असेही ते म्हणाले.

भारताने चिनी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावतांना महत्त्वाचा प्रदेश सैन्याने घेतला नियंत्रणात

चीनच्या सैन्याने पँगाँग तलावाच्या परिसरात २९ ऑगस्टच्या मध्यरात्री केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडतांनाच येथील महत्त्वाच्या भूप्रदेशावर नियंत्रणही मिळवले आहे.