तासगाव नगर परिषद कार्यालय कंटेनमेंट झोन झाल्यामुळे सील

११ सप्टेंबर या दिवशी तासगाव नगर परिषदेतील ७ जण कोरोनाबाधित असल्याचे उघड झाल्याने नगर परिषद कार्यालय कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करून ते सील करावे लागले.

शासन सुस्त; विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठी नावे पाठवली नाहीत ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

शासन सुस्त आहे. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठी शासनाने नावे पाठवली नाहीत, असे वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

अंतिम वर्ष आणि स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना लोकल रेल्वे गाड्यांतून प्रवास करण्यास अनुमती

अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईत लोकल रेल्वे गाडीने प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

भिलवडी (जिल्हा सांगली) येथे १२ सहस्र रुपयांची लाच घेतांना ग्रामविकास अधिकार्‍यास अटक

बांधकाम देयकाचा धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडून १२ सहस्र रुपयांची लाच घेतांना ग्रामविकास अधिकारी राजेंद्र दिनकर पाटील याला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. लाचखोर पाटीलविरुद्ध भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘हिंदु हेल्पलाईन’चे अधिवक्ता प्रदीश विश्‍वनाथ आणि केरळचे भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन् यांना इस्लामी जिहादी आतंकवाद्यांकडून धोका  

सय्यद महंमद सलाहुद्दीन या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय.’च्या) कार्यकर्त्याची ८ सप्टेंबर या दिवशी केरळमधील कन्नूर जिल्हातील कोथूपारंबूजवळील कन्नवम येथे हत्या करण्यात आली.

चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील ५ युवक भारताच्या स्वाधीन

हे पाचही युवक बेपत्ता झाले होते, असे जरी सांगण्यात येत असले, तरी येथील काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी चिनी सैनिकांनी १ सप्टेंबर या दिवशी या युवकांचे अपहरण केल्याचे ट्वीट केले होते. त्यामुळे ही घटना उघड झाली होती.

(म्हणे) ‘भारताचे युवक गुप्तहेर !’ – चीनचा कांगावा

अरुणाचल प्रदेशमधून चीनने ५ भारतीय युवकांचे अपहरण केल्यानंतर त्यांना पुन्हा भारताच्या कह्यात दिले असले, तरी चीनने ‘हे पाचही तरुण भारतीय गुप्तचर संस्थेचे सदस्य होते आणि स्वत:ला शिकारी असल्याचे सांगत होते’, असा दावा केला आहे.

कोरोना विषाणू चीननेच निर्माण केल्याचे पुरावे सादर करणार !

मी जे पुरावे सादर करणार आहे त्यातून विज्ञानाचा गंध नसलेल्यांनाही ‘हा विषाणू मानव-निर्मितच आहे’, हे सहज समजू शकेल – चीनमधील महिला विषाणूशास्त्रज्ञ डॉ. ली मेंग यान

राजधानी देहलीमध्ये प्रतिदिन ७ जण करतात आत्महत्या !

जनतेला गेल्या ७३ वर्षांत साधना न शिकवल्याचाच हा परिणाम ! साधना केल्याने व्यक्ती कोणत्याही स्थितीत स्थिर आणि शांत राहू शकते; मात्र याचा अभ्यास नसल्याने आणि भारताला निधर्मी देश घोषित केल्याने झालेल्या हानीपैकी जनतेची ही एक मोठी हानी आहे, हे लक्षात येईल तो सुदिन !