हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० कोटा पद्धत रहित ! – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची घोषणा

वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ‘७०:३०’ची कोटा पद्धत रहित करण्यात आली असून राज्यासाठी गुणवत्ता सूची करण्याची (‘वन स्टेट वन मेरीट’) पूर्वीची पद्धत लागू राहील, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ८ सप्टेंबर या दिवशी विधानसभेत केली.

सांगली महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने ७ सप्टेंबर या दिवशी आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. गीता सुता यांच्या हस्ते उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सेट-नेट, पी.एच्.डी. धारक संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर ‘काळा शिक्षकदिन’ साजरा

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालय आणि विद्यापीठ यांमध्ये प्राध्यापकांची रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी करत सेट-नेट, पी.एच्.डी. धारक संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर ‘काळा शिक्षकदिन’ साजरा करण्यात आला.

विश्‍व हिंदु परिषदेच्या बजरंग दल शाखेकडून श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन

स्थानिक प्रशासनाने कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी होऊ नये; म्हणून ५ कृत्रिम तलाव आणि १५ श्री गणेशमूर्ती एकत्रीकरण केंद्रे यांची व्यवस्था केली होती; परंतु कृत्रिम हौदातून श्री गणेशमूर्ती काढतांना त्यांची विटंबना होते.

सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी ‘कोविड १९’चे ‘जम्बो’ रुग्णालय उभे करा ! – सुधीरदादा गाडगीळ, आमदार, भाजप

जिल्ह्यात नागरिकांना कोरोनाच्या उपचारासाठी प्रशस्त आणि सर्व सोयी-सुविधा यांनी युक्त रुग्णालयाची संख्या अत्यंत अल्प प्रमाणात असल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे.

काशी विश्‍वनाथ मंदिरासमोरील ज्ञानवापी मशिदीजवळील खोदकामात मंदिराचे अवशेष सापडले !

काशी विश्‍वनाथ मंदिर पाडून तेथे औरंगजेबने ज्ञानवापी मशीद बांधली हा इतिहास आहे आणि त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता सरकारने आणि न्यायालयानेही हे पुरावे लक्षात घेऊन मंदिराची मूळ जागा हिंदूंना द्यावी !

रामजन्मभूमीनंतर आता कृष्णजन्मभूमी आणि काशी विश्‍वनाथ मंदिर यांना मुक्त करण्याची वेळ ! – महंत नरेंद्र गिरि, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

मोगलांनी काशी विश्‍वनाथ मंदिरावर ज्ञानवापी मशिदीचे बांधकाम केले होते. तेथे सध्या चालू असलेल्या खोदकामाच्या वेळी भुयार आणि प्राचीन मंदिराचे अवशेष आढळले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, तेथे मंदिर आहे.

तेलंगाणा उच्च न्यायालयाने अनुमती नाकारल्यावर भाग्यनगर पोलिसांकडून मिळाली होती मोहरमच्या मिरवणुकीला अनुमती !

गेल्या आठवड्यात येथे न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून शेकडो लोक मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या वेळी अनेकांकडून मास्क लावण्यात आले नव्हते, तसेच सामाजिक अंतरही राखण्यात आले नव्हते.

 विधानसभेत ग्रामपंचायत कार्यकाल सुधारणा विधेयक गदारोळात संमत

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत गदारोळात ‘ग्रामपंचायत कार्यकाल सुधारणा विधेयक २०२०’ संमत करण्यात आले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडलेल्या या विधेयकास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला.