भारताचे अद्वितीयत्व !
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’
‘भारतरत्न, नोबेल इत्यादी मानवाने दिलेल्या पारितोषिकांचे ‘संत’ या ईश्वराने दिलेल्या पदवीपुढे काय मूल्य आहे ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘गुरूंचे ऐकायची शिष्याला सवय लागली की, मगच शिष्य देवाचे सांगणे ऐकतो. असे असल्यामुळे अशा शिष्यालाच देव दर्शन देतो; म्हणूनच तो बुद्धीप्रामाण्यवाद्यांना दर्शन देत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भक्ताला, साधना करणार्यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव आपत्काळात वाचवील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म अन् मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
स्वातंत्र्योत्तर काळात समाजधुरिणांनी समाजाला ‘अध्यात्म आणि साधना’ हे विषय शिकवलेच नाहीत. तथाकथित ‘सुधारणावादा’च्या नावाखाली त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. लोकशाहीत कायदे सिद्ध करतांनाही याचा विचार केला गेला नाही.
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले