परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘इतर पंथियांचे ध्येय असते ‘दुसर्या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मंदिरातील देवतेचे कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘नुसते वय वाढणे आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग करणे, यांत भेद आहे. आपले केवळ वय वाढत जाते आणि आपण जीवन जगण्याची संधी गमावत रहातो.
‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’
‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करून घेतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘श्रीराम स्वतः ईश्वराचा अवतार होता. पांडवांच्या वेळी पूर्णावतार श्रीकृष्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी समर्थ रामदासस्वामी होते. यावरून लक्षात येईल की, ईश्वरी राज्याची स्थापना ईश्वर स्वतः करतो किंवा संतांकडून करवून घेतो.
‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले