संतांनी समष्टी प्रसारकार्य करण्यामागील कारण !
‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’
‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’
ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
वैज्ञानिक अनेक वर्षे संशोधन करतात आणि एखादा शोध लावतात. काही वर्षांनी त्या संदर्भात नवीन संशोधन होते आणि आधीचे संशोधन विसरले जाते. याउलट अध्यात्मात संशोधन करावे लागत नाही.
‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्यामुळे हिंदु धर्मात अनंत ग्रंथ आहेत. हे लक्षात न घेता काही धर्मद्वेष्टे हिंदू आणि इतर धर्मीय म्हणतात, ‘हिंदु धर्मात बायबल, कुराण यांसारखा एकच ग्रंथ नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘इतर पंथियांचे ध्येय असते ‘दुसर्या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्रातील नागरिक हिंदु राष्ट्र स्थापनेचा दिवस सुटी घेऊन साजरा करणार नाहीत, तर देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्साहाने कामावर जातील.’
‘हल्लीच्या पालकांना ‘आमचा मुलगा इंग्लीश बोलतो’, याचा अभिमान असतो, तर साधकांना ‘आमचा मुलगा दैवी बालक आहे’, यामुळे कृतज्ञता वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले