साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

‘ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. यासाठी हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’

भारताचे प्रारब्ध पालटण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायच आवश्यक !

‘एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’

देवाचा शोध !

‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’

मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी हे करा !

‘भावी पिढी आतंकवादी निर्माण होऊ नये; म्हणून शाळेतील अभ्यासक्रमातच हिंदु धर्मात सांगितलेले ज्ञान, विज्ञान, तसेच चांगले संस्कार करणार्‍या गोष्टींची शिकवण दिल्यास मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल.’ 

बुद्धीप्रामाण्यवादी आणि साधक यांच्यातील भेद !

‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे प्राण्यांप्रमाणे स्वेच्छेने वागणारे, तर साधक म्हणजे परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागणारे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, संतांचे श्रेष्ठत्व जाणा !

‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ʻराष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’

संतांचे एकमेवाद्वितीयत्व !

‘डॉक्टर फारतर व्याधी कमी करतात; पण मृत्यू टाळू शकत नाहीत. याउलट संत जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनच मुक्त करतात !’

हिंदु धर्मातील परिपूर्णत्‍व !

‘हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे.’ 

सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे !

या वर्षी हिंदु राष्ट्र अधिवेशनाची तपपूर्ती (१२ वर्षे) होत आहे. आता रामराज्यरूपी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष साकार होण्यासाठी स्वक्षमतेनुसार तन-मन-धन आणि प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची, म्हणजेच सर्वोच्च योगदान देण्याची आवश्यकता आहे.  सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे, हे लक्षात घेऊन धर्मसंस्थापनेचे महान कार्य करा !

हिंदु धर्माचे अद्वितीय महत्त्‍व !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’