महिलांशी बोलतांना अत्यंत अश्लील शब्दांचा वापर !
नवी मुंबई – तळोजा सेक्टर ९ येथील पंचानंद इमारतीत दीपावलीनिमित्त महिला विद्युत् रोषणाई करत असतांना मुसलमान पुरुषांनी भांडण उकरून तीव्र विरोध केला आणि दीप लावण्यास विरोध केला. या वेळी मुसलमान पुरुषांनी महिलांना उद्देशून अत्यंत अश्लील वाक्ये उच्चारली. या वेळी महिलांनीही त्याला ‘‘तुमच्या घरात आयाबहिणी नाहीत का ?’’ असा उलट प्रश्न केला. या घटनेचे चित्रीकरण करणार्या हिंदु व्यक्तीवर धावून जाण्याचा प्रयत्नही झाला. अन्य एक मुसलमानाने ‘तुम्ही इमारतीत हिंदु-मुसलमान भेद करत आहात’, असे उलट हिंदु महिलांनाच म्हटले. या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
येथील सोसायटीच्या आवारात बकरी ईद करू न दिल्याचा राग मनात धरून काही धर्मांध मुसलमानांनी हा विरोध केल्याचे समजते. (कायद्याने कुर्बानी ही सार्वजनिक स्थळी देता येत नाही, शासनाने ठरवून दिलेल्या भागातच द्यावी लागते, हे ठाऊक असूनही दिवे लावण्यास विरोध करणारे कावेबाज मुसलमान ! – संपादक)
घटनेच्या व्हिडिओतून मुसलमानांचा उद्दामपणा उघड !
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ‘‘इमारतीत दिवे लागणार नाहीत. तुम्ही हट्टीपणा करू नका’’, असे मुसलमान वारंवार सांगत आहेत आणि त्यांच्या म्हणण्यावर ते ठाम आहेत. हिंदु महिला ‘दिवे लागतीलच’ असे म्हणत आहेत. ‘दिवे लावल्यावर इमारत सुंदर दिसत नाही का ?’ असा प्रश्न एका हिंदूने केल्यावरही मुसलमान विरोध करत आहेत. एक मुसलमान ‘‘दिवे लावायचे नाहीत. तुम्ही रोषणाई केल्यास वाईट होईल. मी सर्व कार्यक्रम रहित करीन. मी वसाहतीच्या अध्यक्षांना (चेअरमनला) सांगितले आहे. ‘सण साजरे करायचे नाहीत’, असे वसाहतीच्या बैठकीत ठरले आहे.’’, असे ओरडून सांगत आहे. त्यावर हिंदु महिलाही स्वत:च्या भूमिकेवर ठाम राहिल्या. अन्य एक मुसलमान अंगावर धावून ‘‘तुम्ही दिवे काढले नाही, तर आम्ही तोडून टाकू’’, असे म्हणत आहे. एकूणच स्थानिक हिंदु नागरिक सामोपचाराची भूमिका घेत असून मुसलमान मात्र ऐकण्याच्या स्थितीत नाहीत, असे चित्र व्हिडिओमध्ये दिसत आहे. विरोध करणार्यांमध्ये एक पदवीधर अभियंता आणि एक उद्योजक सहभागी होता. यानंतर या इमारतीत दिवे लागले कि नाही, हे समजू शकलेले नाही.
प्रसारमाध्यमांकडून विपर्यस्त वृत्तांकन !काही माध्यमांनी ‘मुसलमानांना बकरी ईद साजरी करू न दिल्याने त्यांनी हिंदूंना दिवे लावायला विरोध केला’, अशा आशयाचे वृत्त प्रसारित केले आहे. काहींनी ‘दोन गटांत रोषणाईवरून वाद’ अशा आशयाचेे वृत्त केले आहे. काही माध्यमांनी हिंदु महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या, तेव्हा हिंदु महिलांनी सांगितले, ‘‘बकरी ईदच्या वेळी लोक बकर्या घेऊन वसाहतीतच फिरत होते. त्यांना ‘या आवारात बकरी कापू नये’, एवढीच भूमिका आम्ही घेतली होती, जी कायद्याने ग्राह्य होती.’’ |
संपादकीय भूमिका
|