Bangladesh violence : शेख हसीना यांच्या विरोधात हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई होणार नाही !

अंतरिम सरकारचा आदेश

ढाका (बांगलादेश) – पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात निदर्शने चालू झाल्यानंतर बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात जिहादी मुसलमानांनी हिंसाचार केला. आता महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारने हिंसाचार करणार्‍यांना कायदेशीर संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशाच्या गृह मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, जे विद्यार्थी आणि नागरिक या हिंसाचारात सहभागी आहेत, त्यांना १५ जुलै ते ८ ऑगस्ट २०२४ या काळात केलेल्या कृत्यांबद्दल शिक्षा, अटक किंवा छळ सहन करावा लागणार नाही. (सहस्रावधी हिंदूंना लक्ष्य केलेल्या बांगलादेशातील मुसलमानांना यातून मोकळीक मिळाली असून, हे निषेधार्ह आहे. भारत सरकार यावरून बांगलादेश सरकारची कानउघाडणी करील कि नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

बांगलादेशात लोकशाही नाही, तर इस्लामी हुकूमशाही चालू आहे. याविरोधात अमेरिका आणि अन्य पाश्‍चात्त्य देश तोंड का उघडत नाहीत ?