हुब्बळ्ळी (कर्नाटक) – सार्वजनिक मालमत्तांवर दावा करीत असलेल्या वक्फ बोर्डाविरुद्ध केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘ही आमची भूमी त्यांच्या वडिलांची मालमत्ता आहे का ? अधिकाराच्या हव्यासापोटी मालमत्ता वक्फच्या नावावर करण्याचा प्रयत्न होत आहे.
प्रल्हाद जोशी म्हणाले की, विजयपूर येथील मंदिरालाही वक्फ बोर्डाकडून नोटीस देण्यात आली आहे. तसेच बेंगळुरूमधील विल्सन हॉटेललाही नोटीस दिली आहे. अल्णावरमधील पोलीस ठाण्याला कंपाऊंड घालायला विरोध करण्यात आला आहे. वर्ष २०१३ मध्ये अनेकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून वक्फ बोर्डाला अगणित अधिकार देण्यात आले. पोलीसही असाहाय्य झाले आहेत.