(म्हणे) ‘जनता प्रत्युत्तर देणार !’- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी

देहलीतील आंदोलन देशातील ८० कोटी शेतकर्‍यांचे आहे. मात्र केंद्र सरकार हे आंदोलन मूठभर शेतकर्‍यांचे आणि दलालांचे असल्याचे सांगत आहे

शरद पवारांच्या निकटवर्तीयाला वाचवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली !

अधिवक्ता आणि पत्रकार नानासाहेब जाधव यांचा जनहित याचिकेद्वारे आरोप

माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन !

माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे १५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पुण्यातील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

‘ग्रंथविक्री मोहिमे’च्या निमित्ताने शाळा आणि वाचनालये या ठिकाणी वितरण करतांना लाभलेला प्रतिसाद अन् शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देवगड तालुक्यातील ‘पडेल’ या उपकेंद्रात सलग १५ दिवस ग्रंथविक्रीची मोहीम राबवण्यात आली होती.

महामार्गाचे प्रकल्प अहवाल बनवणारे निम्मे अभियंते बनावट आणि भ्रष्टाचारी आहेत ! – नितीन गडकरी, मंत्री, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक

महामार्गाचे प्रकल्प अहवाल बनवणारे अभियंते बनावट, भ्रष्टाचारी असतांना त्यांची नियुक्तीच कशी केली जाते ? अधिक प्रमाणात पैसे घेऊन वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित खात्याचे मंत्री अशा बनावट अभियंत्यांची नियुक्ती करतात का ?, अशी शंका येते…

अभिनेता सचिन जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक

ओमकार ग्रुप प्र्रमोटर्स आणि सचिन जोशी यांच्यामध्ये झालेल्या १०० कोटी रुपयांच्या एका आर्थिक व्यवहारात अपहार झाल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा अयशस्वी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते; परंतु उपस्थितीअभावी हा मोर्चा रहित करण्यात आला. 

सामाजिक संदेश देत नगरमध्ये आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा !

जागरूक नागरिक मंचच्या वतीने शहीद भगतसिंग उद्यानात देशावर प्रेम व्यक्त करून जातीयवाद नष्ट करण्याचा सामाजिक संदेश देणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे पार पडला.

अखिल भारतीय जैन श्‍वेतांबर गुजराती समाज महासंघाचे केत-कावळे (जिल्हा नगर) येथे २ दिवसांचे अधिवेशन !

जैन श्‍वेतांबर गुजराती समाजाची राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेली संस्था अखिल भारतीय जैन श्‍वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या राज्य कार्यकारिणी समिती सदस्यांचे प्रथमच २ दिवसांचे राष्ट्रीय महाअधिवेशन सेजल वर्ल्ड, केत-कावळे येथे नुकतेच झाले.

पुण्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात एकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

नवनाथ थोरात यांच्या विरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे; मात्र हा गुन्हा खोटा असल्याचे नवनाथ यांचे म्हणणे होते. याची माहिती देण्यासाठी ते ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात १३ फेब्रुवारीच्या सायंकाळी आले.