नवी देहली – देशातील पेट्रोलचे मूल्य १०० रुपयांपर्यंत पोचले असतांना आता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘ओपेक’ या कच्च्या तेलाच्या पुरवठादार देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवायला तूर्तास नकार दिला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ६५ डॉलर प्रति बॅरलच्याही वर गेल्या आहेत. त्या किमती कच्च्या तेलाच्या अल्प पुरवठ्यामुळे अजूनच वाढण्याची आता शक्यता आहे.