विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत मुदतवाढ !

अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यावरील हक्कभंग अन् अवमान प्रकरण

विधानसभेतून…

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे संपादक आणि वृत्त निवेदक अर्णव गोस्वामी अन् अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधात ७ सप्टेंबर २०२० या दिवशी प्रविष्ट केलेले हक्कभंग, तसेच अवमान प्रकरणाचा विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी जिरवळ यांनी ५ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.