एकदाच वापरायच्या प्लास्टिकवर १ जुलै २०२२ पासून बंदी !

यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन, साठवणूक, वितरण आणि वापर यांच्याशी संबंधित सर्व संस्थांना नोटीस पाठवली आहे.

ओडिशातील एका गावात सरपंच पदासाठी निवडणूक लढवत असलेल्या उमदेवारांची गावकर्‍यांनी घेतली लेखी आणि तोंडी परीक्षा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर मतदारांमध्ये अशा प्रकारची जागृती आली, हे कौतुकास्पद असले, तरी ती केवळ एकाच गावात आली आहे, हे भारतियांना लज्जास्पदच होय !

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील ‘श्री समर्थ कोचिंग सेंटर’मध्ये वसंतपंचमीच्या दिवशी करण्यात आले विद्यार्थ्यांचे प्रबोधन !

ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे वसंतपंचमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री समर्थ कोचिंग सेंटर’मध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

‘व्हॅलेंटाईन डे’ची कुप्रथा रोखण्यासाठी युवा पिढीला धर्मशिक्षण दिले पाहिजे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृतीच ! या पाश्चात्त्य ‘डे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळत असून काही धर्मांध संघटना जाणीवपूर्वक तो पसरवत आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्चात्त्य कुप्रथा बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीची प्रबोधन मोहीम !

व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते.

जोधपूर आणि पाली (राजस्थान) येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात प्रशासनाला देण्यात आले निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पश्चिमी कुप्रथांना युवकांनी बळी पडू नये आणि भारतीय संस्कृतीतील प्रेमाच्या व्यापक स्वरूपाची ओळख युवकांना व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘संस्कृती रक्षण अभियान’ चालवण्यात येते.

(म्हणे) ‘बुरखाबंदी प्रकरणी महाविद्यालयाच्या प्रशासनाला समज द्या !’ – आमदार रईस शेख

महाविद्यालयात हा नियम पूर्वीपासूनच लागू असतांना अद्यापपर्यंत कुणी याला हरकत घेतली नव्हती, मग आताच अशी मागणी का केली जात आहे ? बुरखा घालून मुले या महाविद्यालयातील मुलींना त्रास देत होती, याविषयी रईस शेख का बोलत नाहीत ?

श्रीलंकेतील नौदलाकडून भारताच्या १२ मासेमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने सांगितलेले हे कारण योग्य आहे कि ‘श्रीलंका भारतावर कुरघोडी करण्यासाठी भारतीय मासेमारांना अटक करत आहे’, हे भारतीय जनतेला समजायला हवे !

राष्ट्रीय शेअर बाजराच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्णन् यांना ३ कोटी रुपयांचा दंड !

मनमानी कारभार केल्याच्या प्रकरणी, तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रुटींमुळे ‘सेबी’ने केली कारवाई !

झारखंडमधील नौशाद शेख गेल्या ३ वर्षांपासून ४० लाख खर्च करून बांधत आहेत भगवान श्रीकृष्णाचे मंदिर !

‘पार्थसारथी मंदिर’ या नावाने हे मंदिर बांधले जात आहे. वर्ष २०१९ पासून याचे बांधकाम चालू आहे.