ह.भ.प. मंगलाताई कांबळे (वय ७६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन !

ह.भ.प. मंगलाताई कांबळे (वय ७६ वर्षे) यांचे १७ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या ह.भ.प. मंगलाताई या अतिशय देवभक्त होत्या. समाजप्रबोधन आणि जनजागृती यांसाठी त्यांनी कीर्तनकार-प्रवचनकार होऊन परदेशातही धर्म-अध्यात्माचा प्रसार केला.

जगद्गुरु डॉ. श्याम देवाचार्य महाराज यांचे देहावसान

राज्यातील नर्मदा कुंभमेळ्याचे संस्थापक जगद्गुरु डॉ.  श्याम देवाचार्य महाराज (वय ६८ वर्षे) यांचे कोरोनामुळे देहावसान झाले. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर ते कुंभमेळ्यासाठी गेले होते.

दळणवळण बंदीमुळे सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा वेळापत्रकात पालट !

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी लागू केली आहे. त्यामुळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा वेळापत्रकात पालट करण्यात आला आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी ५ पर्यंत ५७.८१ टक्के मतदान

भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल या दिवशी मतदान घेण्यात आले असून २ मे या दिवशी निकाल घोषित होणार आहे.

पुरोहितांना ५ सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य करा ! – निखिल लातूरकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दळणवळण बंदी घोषित केल्याने राज्यातील पुरोहितवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यातील ७ गावे हॉटस्पॉटच्या दिशेने !

मोहोळ तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आजपर्यंत ३१ सहस्र रॅपिड अँटिजेन टेस्ट, तर १५ सहस्र आर्.टी.पी.सी.आर्. चाचण्या झाल्या आहेत. तालुक्यातील ७ गावांची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल चालू असून सर्व्हे करण्यासाठी एकूण ३७६ पथके तैनात करण्यात आली आहेत

कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूची संख्या वाढल्याने सोलापूरातील स्मशानभूमीत राखेचा खच !

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

नगरमध्ये शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवून देण्याचा प्रस्ताव !

ब्रेक दि चेन साठी निर्बंध कडक करतांना सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. अनेक गरजू लोक रांगा लावून थाळी घेत आहेत.

निधन वार्ता

सोलापूर येथील सनातनच्या साधिका सौ. मीना नकाते यांच्या आई सुशिला नागनाथ साळुंके (वय ९१ वर्षे) यांचे १६ एप्रिल या दिवशी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्राम आणि प्रभाग (वॉर्ड) नियंत्रण समिती कार्यान्वित

सिंधुदुर्गात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू