नगरमध्ये शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवून देण्याचा प्रस्ताव !

नगर – ब्रेक दि चेन साठी निर्बंध कडक करतांना सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या नियमामुळे गरीब लोक तेथपर्यंत पोचू शकतील का ? अशी शंका व्यक्त केली जात होती; मात्र नगरमध्ये शिवभोजन थाळी गरिबांसाठी वरदान ठरली आहे. अनेक गरजू लोक रांगा लावून थाळी घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणखी ८०० थाळ्या वाढवून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठवला आहे. जिल्ह्यामध्ये २९ केंद्रांवरून थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यांची क्षमता प्रतिदिन ३ सहस्र ५०० थाळी अशी आहे.