सोलापूर – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी लागू केली आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा वेळापत्रकात पालट करण्यात आला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार ३ मे पासून चालू होणार्या सर्व परीक्षा आता ६ मे पासून चालू होणार आहेत, अशी माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही विद्यापिठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणार आहेत. ६ मे पासून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. भाग एक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा चालू होणार आहेत.