नागपूर येथे खासगी रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांकडून आगाऊ पैशांची वसुली ! – माजी महापौर संदीप जोशी यांचा आरोप

शहरातील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट चालूच आहे. सरकारचा आदेश झुगारून बहुतांश खासगी रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांकडून आगाऊ स्वरूपात पैशाची वसुली करतात.

‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा देऊन राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा !

पत्रकार सातत्याने वृत्तांकनाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक आहे.

आयुर्वेदाच्या चिकित्सेमध्ये कोरोना महामारीवर उपचार करण्याचे सामर्थ्य ! – काशी हिंदु विश्‍वविद्यालय

आयुर्वेदाचे चिकित्साशास्त्र केवळ आयुष काढ्यापर्यंतच मर्यादित नसून त्यामध्ये सध्याच्या कोरोना महामारीवर उपचार करण्याचे सामर्थ्य आहे, अशी माहिती येथील काशी हिंदु विश्‍वविद्यालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

जिल्हा रुग्णालयात ‘प्लाझ्मा’ देण्यासाठीचे यंत्र उपलब्ध करून द्यावे ! –  देव्या सूर्याजी, अध्यक्ष, युवा रक्तदाता संघटना

कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना प्लाझ्मा मिळवणे म्हणजे मोठे अग्नीदिव्य असून प्लाझ्मा देण्यासाठी कोरोनाच्या संसर्गातून बरी झालेली आणि त्याच रक्तगटाची व्यक्ती शोधतांना रुग्णांच्या नातेवाइकांचे अक्षरशः हाल होत आहेत. त्यात त्या व्यक्तीला कोरोनातून बरे होऊन २८ दिवस होणे आवश्यक आहे

देहली येथून ‘रेमडेसिविर’ आणल्याचे सांगण्याचा दिखाऊपणा टाळायला पाहिजे होता !

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने खासदार सुजय विखे पाटील यांना फटकारले.

गोवा राज्यातून नगर येथे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या ४ कोरोनाबाधित रुग्णांना पुन्हा गोवा राज्यात पाठवले

कोरोनाबाधित असलेले ४ रुग्ण घेऊन गोवा राज्यातून महाराष्ट्रातील नगर येथे जाणार्‍या रुग्णवाहिकेला मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथील पोलीस तपासणीनाक्यावर पोलिसांनी अडवले अन् पुन्हा गोवा राज्यात पाठवले.

कोनगाव (भिवंडी) येथील बकरी बाजारात ग्राहकांची गर्दी

कोरोनाचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी, हिंदूंवर मर्दुमकी गाजवत कारवाई करणारे पोलीस अन्य धर्मियांच्या कृत्यांकडे मात्र दुर्लक्ष करतात. असे दुटप्पी पोलीस काय कामाचे ?

राज्यातील २४ जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची वाढ रोखणे, हे आमचे ध्येय ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मागील २ आठवड्यांशी तुलना केली, तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील कोरोनाची रुग्णसंख्या न्यून झाली आहे; मात्र अद्यापही २४ जिल्ह्यांतील रुग्णांची वाढ कायम आहे.

पालघरवासियांवर आता रेल्वेमध्ये कोरोनाचे उपचार होणार !

रेल्वेच्या विशेष विलगीकरण डब्यांमध्ये पालघरवासियांवर कोरोना संदर्भात उपचार करण्यात येणार आहेत. विलगीकरण डब्यांची रेल्वे पालघरमध्ये आली असून गाडीत ३७० कोरोनाबाधितांवर उपचार करणे शक्य होणार आहे

दिवसभरात २ सहस्र ८१४ कोरोनाबाधित, तर ५२ रुग्णांचे निधन

राज्यात ४ मे या दिवशी कोरोनाबाधित २ सहस्र ८१४ नवीन रुग्ण आढळले आहेत. ४ मे या दिवशी कोरोनाशी संबंधित एकूण ६ सहस्र ५५२ चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४२.९४ टक्के आहे.