गोवा राज्यातून नगर येथे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या ४ कोरोनाबाधित रुग्णांना पुन्हा गोवा राज्यात पाठवले

प्रतीकात्मक छायाचित्र

बांदा – कोरोनाबाधित असलेले ४ रुग्ण घेऊन गोवा राज्यातून महाराष्ट्रातील नगर येथे जाणार्‍या रुग्णवाहिकेला मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथील पोलीस तपासणीनाक्यावर पोलिसांनी अडवले अन् पुन्हा गोवा राज्यात पाठवले. तपासणीनाक्यावरील आरोग्य पथकाच्या सतर्कतेमुळे त्यांचा गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा डाव फसला.

गोव्यातून आलेले ४ जण येथील तपासणीनाक्यावर उतरले. त्याची तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्या वेळी पथकाने त्वरित तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना संपर्क केला अन् त्या रुग्णांना रुग्णवाहिकेतून पुन्हा गोवा राज्यात पाठवण्यात आले. या वेळी त्या रुग्णांना समज देत गोवा राज्यात अलगीकरणात रहाण्याचा समादेश देण्यात आला.