कोनगाव (भिवंडी) येथील बकरी बाजारात ग्राहकांची गर्दी

कोरोनाचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

हिंदूंवर मर्दुमकी गाजवत कारवाई करणारे पोलीस अन्य धर्मियांच्या कृत्यांकडे मात्र दुर्लक्ष करतात. असे दुटप्पी पोलीस काय कामाचे ?

ठाणे, ४ मे (वार्ता.) – भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे जिल्ह्यातील मोठा बकरी बाजार भरतो. संचारबंदी आणि दळणवळण बंदी यांच्या काळातही हा बाजार उघडपणे चालू आहे. त्यामुळे गावात कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बाजाराच्या दिवशी येथे शेकडोंच्या संख्येत बकरे खरेदी करणार्‍यांची गर्दी होते; मात्र या वेळी तेथे कोरोनाच्या नियमांचे पालन होत नाही. प्रशासन आणि पोलीस यांनी याची गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (अशी मागणी ग्रामस्थांना का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)

बाजारातील अन्य दुकाने ११ वाजण्याच्या पूर्वीच बंद करण्याची घाई करणारे पोलीस बकरी बाजाराकडे मात्र कानाडोळा करतात. सकाळी ११ नंतरही हा बाजार बराच वेळ चालू असतो. बकरी बाजाराला राजकीय पाठबळ असल्याने कारवाई होत नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.