‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा देऊन राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा !

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे विनंती !

बाळासाहेब थोरात

मुंबई – पत्रकार सातत्याने वृत्तांकनाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर’ चा दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करावे, अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रामध्ये बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, तमिळनाडू, मध्यप्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, आंध्रप्रदेश या राज्यांतील शासनाने याविषयीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानेही लवकरात लवकर याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा.’’