युक्रेनच्या ऐतिहासिक शहर लिविवजवळ रशियाकडून क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण !

लिविवजवळ रशियाकडून क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमणानंतर तेथून निघणारे धुराचे लोट

कीव (युक्रेन) – देशातील पश्‍चिम भागात असलेल्या लिविव शहराजवळ विमानांच्या देखरेखीसाठी असलेल्या आस्थापनावर रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे, असे वृत्त बीबीसीने प्रसिद्ध केले आहे. ‘या आक्रमणामध्ये कुणी मारले गेलेले नाही’, असे शहराच्या महापौरांनी सांगितले. लिविव हे ऐतिहासिक शहर असून त्याच्याजवळ करण्यात आलेले हे आक्रमण गंभीर असल्याचे मानले जात आहे. आतापर्यंत युद्धापासून स्वत:च्या बचावासाठी युरोपमध्ये जाता यावे, या दृष्टीने युक्रेनी जनतेला हे शहर सुरक्षित होते.

पोलंडच्या ‘पोलिश बॉर्डर गार्ड’नुसार रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध आरंभ झाल्यापासून आतापर्यंत २० लाख युक्रेनी जनतेने पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे.