हिंदु धर्मामुळे प्रभावित होऊन नामजप करत लढत आहे युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ !

  • युद्धभूमीवर असतांना रात्रीच्या वेळी करतो ‘हरे राम हरे कृष्ण’ नामजप !

  • युद्धभूमीवर एका हातात ‘एके-४७’, तर दुसर्‍या हातात जपमाळ !

युद्धासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही लढणारा युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ याच्यासारखी भगवंतावरील श्रद्धा किती हिंदूंमध्ये आहे ? – संपादक

युद्धासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही लढणारा युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ (डावीकडे)

कीव (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घनघोर युद्ध चालू आहे. बलाढ्य रशियन सैन्याच्या विरोधात युक्रेनचे सैनिक चिवट झुंज देत आहेत. त्यांच्यात आंद्रे नावाचा एक असाही सैनिक आहे, जो हिंदु धर्मामुळे प्रभावित झाला असून युद्धावर जातांना स्वत:समवेत जपमाळ घेऊन जात आहे. युद्धभूमीवर एका हातात बंदुक, तर दुसर्‍या हातात जपमाळ घेऊन तो मातृभूमीचे रक्षण करत आहे.

‘आज तक’ या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना आंद्रे याने सांगितले की, तो दोन वेळा भारतात येऊन गेला आहे. भारतात तो एकदा मणीपूरमध्ये आणि नंतर वृंदावन येथे राहिला. येथे त्याचा एका आध्यात्मिक संघटनेच्या अनुयायांशी परिचय झाला. तेव्हा त्याला ‘हरे कृष्णा हरे रामा’ या मंत्रजपाविषयी समजले. आंद्रे त्याच्याकडील जपमाळ दाखवून म्हणाला, ‘‘युद्धभूमीवर असतांना रात्रीच्या वेळी मला वेळ मिळतो. तेव्हा मी ‘हरे राम हरे कृष्ण’ हा मंत्रजप करत असतो.’’

आंद्रे पुढे म्हणाला, ‘‘मी युक्रेनच्या सैन्यात भरती होण्यासाठी गेलो. तेव्हा सैन्याधिकार्‍यांनी दुसर्‍याच दिवशी माझ्या हातात ‘एके-४७’ बंदुक दिली. तेव्हापासून मी या भागामध्ये दिवसरात्र सुरक्षेचे काम करत आहे.’’