उत्तरप्रदेशमध्ये मुसलमान कंत्राटदाराकडून हिंदु महिला अभियंत्यावर बलात्काराचा प्रयत्न !

उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात एका हिंदु महिला अभियंत्याने सोहेल खान नावाच्या मुसलमान कंत्राटदारावर घरात घुसून बलात्कार आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

लव्ह जिहादच्या प्रकरणी जिवंत जाळलेल्या हिंदु तरुणीचा अंतत: मृत्यू !

राज्यातील दुमका येथे एकतर्फी प्रेमातून शाहरुख हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाने अंकिता कुमारी नावाच्या हिंदु मुलीवर २३ ऑगस्ट या दिवशी पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले होते. यात ती ९० टक्के भाजली होती. मृत्यूशी झुंजत असलेल्या अंकिताचा अंतत: २७ ऑगस्टच्या रात्री मृत्यू झाला.

गोव्यात घातक अमली पदार्थाची (‘डिझाईनर ड्रग्स’ची) निर्मिती होत असल्याची माहिती उघड

गोव्याचे नाव ‘अमली पदार्थ व्यवसायाचे एक मुख्य ठिकाण’, असे  आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त झालेले आहे. अभिनेत्री तथा भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर गोव्यात घातक अमली पदार्थांची (‘डिझाईनर ड्रग्स’ची) निर्मिती होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

‘५ जी’ सेवा दिवाळीत उपलब्ध होणार ! – मुकेश अंबानी, रिलायन्स समूह प्रमुख

रिलायन्सच्या ५ जी सेवेत २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली आहे.

अमली पदार्थ सेवन करणार्‍या चालकांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणार्‍यांच्या जिविताला धोका ! – केरळ उच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालयाने प्रशासनाला अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या बसचालकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा चालकांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणार्‍या सर्वसाधारण समाजाचा जीव धोक्यात येतो.

मुसलमानाने हिंदु मुलीचे अपहरण केल्यानंतर जमावाकडून मशिदीवर आक्रमण

मध्यप्रदेशच्या देवास जिल्ह्यातील उदयनगर भागात २६ ऑगस्ट या दिवशी फरझान नावाच्या मुसलमान तरुणाने एका हिंदु मुलीचे अपहरण केले. या घटनेनंतर तेथे हिंसाचार उसळला. संतप्त लोकांनी आरोपी फरझान याचे घर आणि गावातील मशीद यांवर आक्रमण करून त्यांची तोडफोड केली.

सत्तासंघर्षाचा निकाल ५ वर्षे लागण्याची शक्यता नाही ! – भरतशेठ गोगावले, आमदार, शिंदे गट

सत्तासंघर्षाचा निकाल ५ वर्षे लागण्याची शक्यता नाही. सरकार कोसळेल याची काही जण वाट पहात होते; पण यानंतर २०२४ ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले आहे.

पंढरपूर येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर प्राप्तीकर विभागाची कारवाई ! 

पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि ‘डीव्हीपी’ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे पंढरपूर शहरातील निवासस्थान आणि कार्यालय येथे प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी २६ ऑगस्ट या दिवशी एकाच वेळी धाड टाकली.

इंदापूर (पुणे) येथील धर्मांध पोलिसानेच पशूवधगृहातून सोडवून आणलेली ३१ गोवंशीय जनावरे कसायांना दिली !

गोरक्षण केल्यास गोरक्षकांवरच खोटे गुन्हे नोंद करण्याची धमकी

शीव (मुंबई) येथील तलावात घरगुती, तर चौपाटी आणि माहीम रेती बंदर येथे सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करावे – मुंबई महापालिका

शीव, चुनाभट्टी इत्यादी नजीकच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असतात. तथापि तलावाची मर्यादा लक्षात घेऊन यंदाच्या गणेशोत्सवापासून या तलावात मोठ्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, अशी विनंती ‘एफ् उत्तर’ विभागाचे साहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी केली आहे.