उत्तरप्रदेशमध्ये मुसलमान कंत्राटदाराकडून हिंदु महिला अभियंत्यावर बलात्काराचा प्रयत्न !

सोहेल खान

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात एका हिंदु महिला अभियंत्याने सोहेल खान नावाच्या मुसलमान कंत्राटदारावर घरात घुसून बलात्कार आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिला ‘जल निगम (ग्रामीण)’मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. आरोपी सोहेल त्याच विभागात कंत्राटी काम करतो. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी सोहेल खान हा पीडित महिलेच्या ओळखीचा होता. रक्षाबंधनच्या दिवशी पीडित महिलेने त्याला राखीही बांधली होती. आरोपी सोहेल पीडित महिलेला बहीण मानायचा. २३ ऑगस्टच्या रात्री ११ वाजता सोहेल खान तिच्या घरी गेला. त्याने घरात घुसताच दार लावून घेतले. त्याने तिचा विनयभंग केल्यावर तिच्यावर बलात्काराचा प्रयत्नही केला. सोहेलच्या या कृतीचा महिलेने विरोध केला आणि धाडस दाखवत बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या सोहेलवर वार केला. त्यानंतर पीडित मुलीने आरडाओरडा केला. शेजारचे लोक जमले आणि तिच्यावर ओढवलेले संकट टळले, असे पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

बहीण मानून राखी बांधण्याचे नाटक करणाऱ्या मुसलमान व्यक्तींवर हिंदु महिलांनी विश्वास ठेवू नये !