पाकिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांकडून पोलीस ठाण्यावर नियंत्रण मिळवून आतंकवाद्यांची सुटका !

ज्या प्रमाणे पाक भारतात आतंकवादी घुसवून आक्रमणे करतो, त्याचप्रमाणे तालिबानी आतंकवादी पाकमध्ये घुसून पाकला जेरीस आणत आहेत ! ‘जसे आपण करतो, तसे भोगतो’, याचाच प्रत्यय पाकला सध्या येत आहे !

तालिबान सरकार मुलांना देणार कट्टरतावादाचे शिक्षण !

अशी मुले भविष्यात आतंकवादी झाल्यास आणि त्यांनी भारताच्या विरोधात जिहाद पुकारल्यास आश्‍चर्य ते काय ? भारताने आतापासून सतर्क राहून पावले उचलणे आवश्यक !

‘पठाण’सारखे चित्रपट बनवणार्‍यांना भिकारी बनवा ! – कालीचरण महाराज यांचे आवाहन

‘धर्माचा अवमान करणार्‍यांना अशीच शिक्षा दिली जाते’, हा धडा त्यांना शिकवा, असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले आहे.

खडतर ठिकाणी स्थानांतर नको; म्हणून प्रामाणिक अधिकारी लाच घेण्याचा विचार करतात !

भारतात प्रामाणिक सरकारी अधिकार्‍यांची अशी मानसिकता असेल, तर देशातील भ्रष्टाचार कधीतरी नष्ट होऊ शकेल का ? ही स्थिती धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांचे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेण्याची पात्रता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबियांची नाही ! – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

शरद पवार यांनी ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगले, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि अर्थमंत्री होत आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते. त्यांचाच नातू परत आमदार होतो.

मध्यप्रदेशातील मदरशांच्या वाचन साहित्याची तपासणी करण्याचा गृहमंत्र्यांचा आदेश

अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून मदरशांच्या वाचन साहित्याची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे.

शिवसेनेच्या मूळ कार्यालयाची जागा शिंदे गटाकडे, तर ठाकरे गटासाठी नवीन कार्यालय !

सध्या ‘शिवसेना’ हे नाव आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ यांविषयीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे; मात्र ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून ‘आपण मूळ शिवसेना’ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दौंड (पुणे) येथे विवाहित हिंदु तरुणाची ‘सुंता’ करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

धर्मांध हिंदु मुलींसमवेत आता हिंदु तरुणांचेही धर्मांतर करत आहेत, हे हिंदूंच्या असित्वासाठी धोकादायक आहे. हिंदु तरुण आणि तरुणी यांचे प्रबोधन करण्यासमवेत त्यांना धर्मशिक्षण देणेही आवश्यक आहे !

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरण भारताच्या कायदेतज्ञांकडे पाठवले आहे ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये हे प्रकरण केंद्रीय कायदेतंत्रांचा सल्ला घेण्यासाठी पाठवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यपालाच्या कृतीवर आक्षेप घेणारे अशोक चव्हाण यांना सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी फटकारले !

राज्यपालांच्या हेतूविषयी सभागृहात प्रश्न उपस्थित करता येत नाही. ‘मुख्यमंत्रीपद भूषवले असतांनाही याविषयी माहिती कशी नाही ?’, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात अशोक चव्हाण यांना फटकारले.