‘पठाण’सारखे चित्रपट बनवणार्‍यांना भिकारी बनवा ! – कालीचरण महाराज यांचे आवाहन

कालीचरण महाराज

नवी देहली – ‘पठाण’सारख्या चित्रपटांवर बहिष्कार घातला पाहिजे. इतकेच नाही, तर असे चित्रपट बनवणार्‍यांना भिकारी बनवले पाहिजे. जो धर्माच्या विरोधात आहे, त्याच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. मी सर्व हिंदु भाऊ आणि बहिणी यांना आवाहन न करतो की, जागे व्हा आणि हिंदु धर्माचा अवमान करणार्‍या चित्रपटांवर संपूर्ण बहिष्कार घाला.

‘धर्माचा अवमान करणार्‍यांना अशीच शिक्षा दिली जाते’, हा धडा त्यांना शिकवा, असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले आहे.