तालिबान सरकार मुलांना देणार कट्टरतावादाचे शिक्षण !

बिगर-मुसलमानांना ठार मारणे, महिलांना शिक्षा करणे यांसारखे विषय अंतर्भूत करणार

डावीकडे अमरुल्लाह सालेह

काबुल – तालिबान सरकारने अफगाणिस्तानमध्ये आतंकवाद लादण्यास चालू केले आहे. आधी त्याने मुलींना शाळा-महाविद्यालयांत जाण्यापासून रोखले आणि आता  सरकारने संपूर्ण अभ्यासक्रम पालटण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमात आतंकवादी शिकवणीचा समावेश करण्यात येणार आहे. अफगाणिस्तान कह्यात आल्यानंतर स्वतःला अफगाणिस्तानचे कार्यकारी अध्यक्ष घोषित करणार्‍या अमरुल्लाह सालेह याने ट्वीट करून तालिबानच्या या नवीन योजनेची माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, तालिबान नवीन अभ्यासक्रमात ६२ नवीन विषय जोडत आहे.

१. या अभ्यासक्रमानुसार संयुक्त राष्ट्रांचे सैतानी स्वरूप समोर आणणे, बिगर मुसलमानांना ठार मारणे, महिलांना शिक्षा करणे आणि आत्मघाती आक्रमणे योग्य असल्याची शिकवण देणे आदी सूत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

२. अमरुल्लाह सालेह म्हणाला की, जागतिक प्रसारमाध्यमे तालिबानला ‘सुधारणावादी’ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर येण्यासाठी देशातील भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे खोटे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका

अशी मुले भविष्यात आतंकवादी झाल्यास आणि त्यांनी भारताच्या विरोधात जिहाद पुकारल्यास आश्‍चर्य ते काय ? भारताने आतापासून सतर्क राहून पावले उचलणे आवश्यक !