मध्यप्रदेशातील मदरशांच्या वाचन साहित्याची तपासणी करण्याचा गृहमंत्र्यांचा आदेश

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (डावीकडे)

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील काही मदरशांमध्ये आक्षेपार्ह गोष्टी शिकवण्याशी संबंधित माहिती आमच्याकडे आली आहे. अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून मदरशांच्या वाचन साहित्याची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे.

यातून मदरशांमध्ये शिकवल्या जाणार्‍या अभ्यासक्रमात आणखी किती सुधारणा आवश्यक आहेत हेही कळू शकेल, असे मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.