शिक्षिका पत्नी आणि धर्मांध चालक यांच्यातील अनैतिक संबंधांना कंटाळून शिक्षक पतीची आत्महत्या !

शिक्षिका पत्नी धर्मांध वाहनचालकाच्या प्रेमात पडल्याने पतीने आत्महत्या केली. पत्नी आणि तिचा धर्मांध प्रियकर यांच्यावर साडेतीन मासांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. चंद्रकांत सुरवसे हे असोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहशिक्षक, तर त्यांची पत्नी तेथे सहशिक्षिका म्हणून काम करत होती.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्येक भारतीय भाषेला योग्य आदर आणि महत्त्व देणार ! – पंतप्रधान मोदी 

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्येक भारतीय भाषेला योग्य आदर आणि महत्त्व देणार असून जे लोक स्वार्थासाठी भाषेच्या नावाखाली राजकारण करत आहेत, त्यांना त्यांचे दुकान बंद करावे लागेल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

सोलापूर जिल्ह्यातील पीक विमा आस्थापनांचे ऑडिट करावे ! – राम सातपुते, आमदार, भाजप

शेतकरी बांधव कष्टाने पीक विम्याचा हप्ता भरतो; मात्र विमा आस्थापने शेतकर्‍यांना फसवतात. सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी ३ वर्षांत विम्यासाठी भरलेल्या पैशांचे लेखा परीक्षण करून आस्थापनांवर कारवाई करणार का ?

शाळेत टिळा लावून आल्याने मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्याला ठार मारण्याची धमकी !

शाळेत शिकणारे मुसलमान विद्यार्थी हिंदु विद्यार्थ्याला टिळा लावण्यास विरोध करतात, यावरून ते सर्वधर्मसमभावाचा कोणताही मान राखत नाहीत, हे स्पष्ट होते. हिंदु या आत्मघाती सर्वधर्मसमभावचे पालन का करत आहेत ?

महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने क्रांतीशाहीर दीक्षित यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी !

येथे महाराष्ट्र शाहीर परिषद आणि लोककलावंत विकास परिषद सांगली यांच्या वतीने क्रांतीशाहीर कै. ग.द. दीक्षित यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुण्यातील आतंकवादी कटाच्या कारवाई प्रकरणात रत्नागिरीतून आणखी एकाला अटक ! 

ए.टी.एस्.ने (आतंकवादविरोधी पथकाने) पुण्यातील आतंकवादी कटाच्या अन्वेषणात आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांच्या मुसक्या आवळायला चालू केले आहे. २ आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर आता आणखी एकाला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे.

‘लँड जिहाद’द्वारे भूमी हडपणारा ‘वक्फ’ कायदा रहित करा !

हिंदु जनजागृती समितीची केंद्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी !

गोवा एक्सप्रेस दीड घंटा आधी येऊन प्रवाशांना न घेताच निघून गेली !

रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा !

विधानभवनात मनासारखे दालन न मिळाल्याने ‘कॅबिनेट’ मंत्र्याचा कार्यालयावर बहिष्कार !

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे डॉ. गावित यांनी लेखी तक्रारही केल्याचे समजते; मात्र त्याची अध्यक्ष नार्वेकर यांनी अद्याप नोंद घेतली नाही.

हिंदु मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला अटक !

‘येथे आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला हिंदु मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या एका मुसलमान मैत्रिणीने तिची आसिफशी ओळख करून दिली होती.