कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांत कठोर निर्बंध !

कोरोनाचे प्रमाण पुष्कळ वाढल्याने विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अमरावती शहरात १२ प्रतिबंधित क्षेत्रे, तर नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांतही ‘दळणवळण बंदी’च्या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला जात आहे.

पुणे जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

पुणे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी दिले.

‘लॉकडाऊन’ नको असेल, तर कोरोनाचे नियम पाळा ! – मुख्यमंत्री

‘वर्क फ्रॉम होम’ करा. येत्या काळात परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून २१ फेब्रुवारी या दिवशी साधलेल्या संवादात सांगितले.

शिवछत्रपतींचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आजही समस्त भारतीय लोकांना प्रेरणादायी ठरत आहे ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा अग्रभागी ठेवली जाते. याचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानून संघाचे काम चालू आहे…..

क्रांतीकारक वासुदेव बळंवत फडके पुरस्कार ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान संचलित चैतन्याश्रमाला प्रदान !

सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी क्रांतीकारक वासुदेव बळंवत फडके यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देण्यात येणारा पुरस्कार यंदा १७ फेब्रुवारी या दिवशी ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान संचलित चैतन्याश्रमाला प्रदान करण्यात आला.

बाणावली येथे ‘धिर्यो’चे आयोजन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना कह्यात घेऊन २० मिनिटांत सोडले

बाणावली येथे १६ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या ‘धिर्यो’च्या (बैलांची झुंज) आयोजनावरून कोलवा पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले. पोलिसांनी ‘पिपल फॉर अ‍ॅनिमल्स’ (पी.एफ्.ए.) या प्राणीप्रेमी संघटनेच्या तक्रारीची नोंद घेऊन ही कारवाई केली.

वारकर्‍यांना मठाबाहेर काढल्यास वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची चेतावणी

माघ यात्रेसाठी शहरातील काही मठ आणि धर्मशाळा येथे यापूर्वीच आलेल्या भाविकांना मठाबाहेर काढू नये, वारकर्‍यांना मठ आणि धर्मशाळा येथून बाहेर काढण्यास पोलिसांनी बळजोरी केल्यास वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, अशी चेतावणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी दिली आहे.

साखर कारखाना उसाची तोडणी करत नसल्याने शेतकर्‍याने उसाच्या शेताला लावली आग !

करंजगावातील शेतकर्‍यांनी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त केला, तर राजकीय विरोधातून ही ‘स्टंटबाजी’ केली जात आहे, असे साखर कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.

वृद्ध, अपंग आणि रुग्ण भाविकांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २ ई-रिक्शा भेट !

दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी माधवी निगडे वेल्फेअर फाऊंडेशन आणि वेणू सोपान वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने गिअर बॉक्स असलेल्या बॅटरीवर धावणार्‍या २ ई-रिक्शा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देण्याचा सोहळा २१ फेब्रुवारीला ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या हस्ते पार पडला.

कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाची आरोग्य विभागाकडून तपासणी

राज्यातील इतर जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाचीही तपासणी हाती घेण्यात आली आहे.