वेश्याव्यवसाय चालवणारी ७८ संकेतस्थळे गोवा पोलिसांकडून बंद

चित्तोड, आंध्रप्रदेश येथील ५४ वर्षीय सय्यद उस्मान आणि गुडगाव, हरियाणा येथील ३० वर्षीय महंमद मोहेबबुल्ला यांना एस्कॉर्ट संकेतस्थळ तयार केल्याबद्दल आणि वेश्याव्यवसाय जाळे चालवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने रेवदंडा गडावर स्वच्छता मोहीम !

अलिबाग येथे १० नोव्हेंबर या दिवशी रेवदंडा गडावर ‘सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग’ विभागाच्या मावळ्यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेत २५ हून अधिक दुर्गसेवकांनी सहभाग घेतला.

धारगळ येथील स्थानिकांचा ‘सनबर्न’ला विरोध

गोव्यातील अनेक ठिकाणी विरोधाला सामोरे गेल्यानंतर सनबर्नच्या आयोजकांनी त्यांचा ‘इलेक्ट्रॉनिक डान्स अँड म्युझिक (इडीएम्) महोत्सव’ धारगळ येथे हालवण्यात आल्याचे संकेतस्थळावर स्पष्टपणे सूचित केले आहे.

नोकरी घोटाळा प्रकरणी भाजपचे आमदार गणेश गावकर यांच्याविरुद्ध तक्रार

सावर्डेचे भाजपचे आमदार गणेश गावकर यांच्यावर सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवल्याच्या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

मालवण येथे अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटकातील ‘हायस्पीड ट्रॉलर’ला २५ लाख रुपयांचा दंड

तारकर्ली येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटक राज्यातील अतीजलद यांत्रिक नौकेवर (हायस्पीड ट्रॉलरवर) कारवाई करून नौकेच्या मालकाकडून २५ लाख ८७ सहस्र ५२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती येथील मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

नवी मुंबई महापालिकेने शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली !

अर्ज ऑनलाईन  पद्धतीने www.schemenmmc.com या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येत आहेत.

परगावी जा; परंतु २० नोव्हेंबरला आपल्या गावी जाऊन मतदान करा ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

एस्.टी. महामंडळाचा मतदार जनजागृतीसाठी विशेष सहभाग ! 

तुळशीविवाहाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची करण्यात आलेली विशेष रूपातील पूजा !

श्री महालक्ष्मीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेऊया.

मतदानासाठी सुटी, सवलत न दिल्यास कारवाई ! – डॉ. सुहास दिवसे, पुणे जिल्हाधिकारी

मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या घंट्यांमध्ये सवलत देण्यात येते; मात्र काही आस्थापने, संस्था भरपगारी सुटी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले आहे.