जळगाव येथे दंगली घडवणार्‍या ८ ते १० धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद !

अशा धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई सरकारने केली पाहिजे !

सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांना घेतल्यास जलसमाधी घेणार !

शासनाला हे का कळत नाही ? या निर्णयामुळे स्थानिक बेरोजगार डी.एड्. उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या बेरोजगारांना शिक्षण सेवेत सामावून घ्यावे, तसेच शिक्षकभरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

श्री स्‍वामी समर्थ अन्‍नछत्र मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमा उत्‍सव मोठ्या उत्‍साहात संपन्‍न !

नादब्रह्म, पुणे यांचे ढोल पथक, अमोलराजे भोसले यांचा लेझीम संघ, केरळ येथील ढोल पथक, हरियाणा येथील श्री हनुमान देखावा आणि कोल्‍हापूर येथील हलगी पथक यांच्‍या सहभागाने हा उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.

सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ! – नरहरि झिरवळ, उपाध्‍यक्ष, विधानसभा

सर्व बाजूने विचार केला, तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत; पण हा निर्णय शेवटी अध्‍यक्षांकडे असेल. त्‍यांच्‍याकडे शेवटचे अधिकार आहेत. त्‍यामुळे मी त्‍याच्‍यावर वक्‍तव्‍य करणे उचित ठरणार नाही, असे महत्त्वाचे विधान त्यांनी केले.

आळंदी (पुणे) येथे गोहत्‍येच्‍या निषेधार्थ ‘मूक मोर्चा’ !

आषाढी एकादशीच्‍या दिवशी खेड तालुक्‍यातील कडूसमध्‍ये काही समाजकंटकांनी गोहत्‍या केली होती. त्‍या घटनेच्‍या निषेधार्थ आळंदीमध्‍ये ग्रामस्‍थांच्‍या वतीने ८ जुलै या दिवशी ‘मूक मोर्चा’ काढण्‍यात आला. या निमित्ताने व्‍यापार्‍यांनी दुकानेही बंद ठेवली होती.

खातेवाटप लवकरच स्‍पष्‍ट होणार !- उदय सामंत, मंत्री

१७ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्‍तार होऊ शकतो, असे शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी म्‍हटले आहे, तसेच पूर्वी २-३ दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्‍तार होऊ शकतो, असे भरत गोगावले यांनी म्‍हटले होते.

रेल्‍वेत बाँबस्‍फोट करण्‍याच्‍या संशयास्‍पद संदेशानंतर महाराष्‍ट्रातील रेल्‍वेस्‍थानकांवर सतर्कतेची चेतावणी !

मुंबई पोलिसांना ७ जुलै या दिवशी रेल्‍वेत बाँबस्‍फोट घडवण्‍याविषयी संशयास्‍पद संपर्क आल्‍यानंतर राज्‍यभरातील रेल्‍वेस्‍थानकांवर सतर्कतेची चेतावणी देण्‍यात आली आहे.

परतीच्‍या प्रवासात माऊलींच्‍या पादुकांना नीरा स्नान !

सकाळी ९.३० वाजता पालखी सोहळा उत्‍साहात नीरा नगरीत दाखल झाला आणि येथील विठ्ठल मंदिरात विसावला. माऊलींच्‍या पादुका रथातून विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्‍यात आल्‍या होत्‍या.

राज्‍यातील राजकीय घडामोडींवर पुणेकरांचा ‘एक सही संतापाची’ मोहिमेस प्रचंड प्रतिसाद !

मागील काही मासांमध्‍ये देश आणि राज्‍यात चुकीच्‍या पद्धतीने राजकारण चालू आहे. आपण आज एकाला मतदान केले; पण ४ वर्षांत कोण कोणासह गेले ? हे समजत नसून या राजकीय लोकांनी लोकशाहीची थट्टा केल्‍याचे यातून दिसून येत आहे……

धर्माचे रक्षण, धर्माचरण या कृती आपल्‍या घरापासूनच कराव्‍या लागतील ! – अधिवक्‍ता अभिषेक भगत

महोत्‍सवाच्‍या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्‍यात आले. या वेळी स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके दाखवण्‍यात आली. शेवटी सर्वांनी हिंदु राष्‍ट्र स्‍थापण्‍याच्‍या कार्यात सहभागी होण्‍याची शपथ घेतली.