जळगाव – येथील सुप्रीम कॉलनी परिसरातील ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या ओट्याचे बांधकाम करणार्या हिंदु तरुणांवर ९ जुलै या दिवशी परिसरातील ४०-५० धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक करून दंगल घडवली. (हिंदु मंदिराच्या जागेत बांधकाम करणार्या हिंदूंना विरोध करणार्या धर्मांधांचाच उद्दामपणा यातून लक्षात येतो. अशा वेळी पुरोगामी टोळी कुठल्या बिळात जाऊन लपते ? – संपादक) त्याला हिंदूंनीही प्रत्युत्तर दिले. या दंगलीत ६ हिंदू घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी ८ ते १० धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याविषयी श्री. पवन पाटील (वय २२ वर्षे) यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.
९ जुलैला दुपारी ३ ते ३.३० वाजता सर्वश्री पवन पाटील, श्रीकांतसिंग चौधरी, रवींद्र राठोड, दिवाकर मिसाळ, देवेश पाटील, अजय शेळके, विकास खोटे, गौरव जाधव, अक्षय फरकाडे, नीलेश मिसाळ, संदीप चव्हाण, दीपक घुगे, सजन राठोड, संतोष चव्हाण, गोपी राठोड हे सर्व जण मिळून ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या ओट्याचे काम करत होते. त्या वेळी परिसरातील ४० ते ५० धर्मांधांनी येऊन ‘तुम्ही येथे ओटा का बांधत आहात ?’ असा जाब विचारून त्यांच्याशी वाद घातला. त्या वेळी दीपक घुगे आणि तक्रारदार पवन यांनी त्यांचे चित्रीकरण करण्यास प्रारंभ केला. याचा धर्मांधांना राग आल्याने त्यांनी दगड आणि लाठ्या-काठ्यांनी हिंदूंना मारहाण केली. ‘यांना जिवंत सोडू नका’, अशी चिथावणी देत धर्मांधांनी श्री. पवन पाटील आणि त्यांचे मित्र यांच्यावर मोठे दगड फेकण्यास प्रारंभ केला. यामध्ये सर्वश्री पवन पाटील, श्रीकांतसिंग चौधरी, सजन राठोड, संतोष मोहन, दीपक घुगे आणि रवींद्र राठोड हे घायाळ झाले. या वेळी पवन आणि त्यांचे मित्र यांनी पळत जाऊन पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
संपादकीय भूमिकाअशा धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई सरकारने केली पाहिजे ! |