मुंबई – खातेवाटपाचे सूत्र काही घंट्यांत स्पष्ट होणार असून एक ते दोन दिवसांत मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो, असे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
१७ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असे शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे, तसेच पूर्वी २-३ दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असे भरत गोगावले यांनी म्हटले होते.
राष्ट्रवादीकडून विशिष्ट खात्याचा आग्रह धरला जात असल्याने मंत्रीमंडळाच्या विस्ताराला वेळ लागत असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना अर्थ खाते हवे असल्याची चर्चा आहे आणि शिवसेनेचा याला विरोध आहे.