सर्वोच्च न्यायालयाची विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थन करणार्‍या १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

लोकसभा आणि विधानसभा यांच्या एकत्रित निवडणुकांच्या दृष्टीने आमची सिद्धता चालू ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका एकाच वेळी आल्यास त्यादृष्टीने आमची सिद्धता चालू आहे. या दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्यास काही प्रमाणात अधिक ‘ईव्हीएम्’ यंत्रे लागतील. एका ईव्हीएम् यंत्रात १५ राजकीय पक्षांची नोंद ठेवता येते.

घरफोडीचे ४५ गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगाराला कणकवली (सिंधुदुर्ग) येथे अटक

आरोपी पाटील याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ गुन्हे, कोल्हापूर जिल्ह्यात ९ गुन्हे, गोवा राज्यात ४, कर्नाटक राज्यात २४, असे एकूण ४५ गुन्हे नोंद आहेत. तसेच काही गुन्ह्यांसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते.

प्रख्‍यात तबलावादक उस्‍ताद झाकीर हुसेन यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्‍कार प्रदान !

उस्‍ताद झाकीर हुसेन यांनी ‘कलेच्‍या माध्‍यमातून मी महाराष्‍ट्र आणि देशाची सेवा केली. याची नोंद घेतली याविषयी मी कृतज्ञ आहे’, अशी भावना व्‍यक्‍त केली.

महाराष्‍ट्र शासन करणार महाराष्‍ट्राच्‍या बाहेर मराठीचा प्रचार !

महाराष्‍ट्र आणि महाराष्‍ट्राच्‍या बाहेर मराठीचा प्रचार-प्रसार करण्‍यासाठी शासन ५०० मराठी भाषा युवक मंडळे स्‍थापन करणार आहे. या मंडळांना राज्‍यशासनाकडून प्रतिवर्षी १० सहस्र रुपये इतके अनुदान दिले जाईल.

क्षुल्लक कारणावरून ३ अल्‍पवयीन मुलींचे घरातून पलायन !

पोलिसांनी कल्‍याण रेल्‍वे पोलिसांशी संपर्क करून त्‍या मुलींना कह्यात घेऊन बाल कल्‍याण समितीसमोर उपस्‍थित केले आणि नंतर पालकांकडे सोपवले.

कोल्‍हापूरच्‍या जिल्‍हा माहिती अधिकारीपदी सचिन अडसूळ रुजू !

कोल्‍हापूरच्‍या जिल्‍हा माहिती अधिकारीपदी सचिन अडसूळ ११ जुलैला रुजू झाले. मूळचे सातारा जिल्‍ह्यातील माण तालुक्‍यातील बिदाल येथील असणार्‍या सचिन अडसूळ यांनी यापूर्वी गडचिरोली येथे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून काम केले आहे.

हिंदु मुलाचे धर्मांतर केल्‍याचा आईचा आरोप !

प्रत्‍यक्षात मुलाला भाग्‍यनगर येथे नोकरीसाठी न नेता बुलढाणा जिल्‍ह्यातील उंद्री परिसरात एका मदरशात ठेवण्‍यात आले. याला विरोध केल्‍यावर त्‍याच्‍या आईला आरोपींनी शिवीगाळ करत जिवे मारण्‍याची धमकी दिली. शुभम सध्‍या आई-वडिलांसमवेत रहात आहे; पण ‘मुसलमान धर्म स्‍वखुशीने स्‍वीकारला आहे’, असे त्‍याचे म्‍हणणे आहे.

पुणे येथे बसचालकांच्‍या उद्दामपणाचा स्‍वतः पी.एम्.पी.एम्.एल्.च्‍या अध्‍यक्षांनीच घेतला अनुभव !

या प्रकरणी चालकाला नोटीस बजावण्‍यात आली आहे. त्‍याच्‍यावर आता कारवाई केली जाणार आहे. ‘प्रवाशांनी विनंती केल्‍यावर चालकांनी सर्व थांब्‍यांवर बस थांबवाव्‍यात’, अशा सूचनाही सर्वांना देण्‍यात आल्‍या आहेत.

जैन मुनींच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या ! – प्रांत कार्यालयावर मोर्च्‍याद्वारे मागणी

जैन मुनींच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल आणि वीर सेवा दल यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.