कोल्‍हापूरच्‍या जिल्‍हा माहिती अधिकारीपदी सचिन अडसूळ रुजू !

सचिन अडसूळ यांचे स्‍वागत करतांना माहिती अधिकारी वृषाली पाटील (उजवीकडे), तसेच अन्‍य

कोल्‍हापूर – कोल्‍हापूरच्‍या जिल्‍हा माहिती अधिकारीपदी सचिन अडसूळ ११ जुलैला रुजू झाले. मूळचे सातारा जिल्‍ह्यातील माण तालुक्‍यातील बिदाल येथील असणार्‍या सचिन अडसूळ यांनी यापूर्वी गडचिरोली येथे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून काम केले आहे. जिल्‍हा माहिती कार्यालयाच्‍या वतीने माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी अडसूळ यांचे स्‍वागत केले. या वेळी सचिन वाघ, सतीश कोरे, अनिल यमकर, दामू दाते, स्‍वप्‍नाली कुंभार आदी उपस्‍थित होत्‍या.