नवी मुंबईत विदेशातून आलेल्या प्रवाशांसह २८५ जणांचे अलगीकरण

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विदेशी प्रवाशांसह अद्याप २८५ जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे.

मंत्रालय, विधानभवन, आमदार निवास आदींसह सर्व शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंत्रालय, विधानभवन, आमदार निवास, एस्.टी. महामंडळाच्या सर्व बसगाड्या यांसह सर्व शासकीय कार्यालये यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती………….

कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी पुढे ढकलली

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची येथील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये चालू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे…….

संभाजीनगर येथे ‘सारी’ या व्याधीमुळे रुग्णाचा मृत्यू

येथील एका रुग्णाचे ‘सारी’ (सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) या व्याधीमुळे २४ मार्च या दिवशी निधन झाले. सारी आणि कोरोना यांची लक्षणे समान आहेत.

पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दांपत्याची चाचणी निगेटिव्ह

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र येथे आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित दांपत्याची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे.

संचारबंदी असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांना पोलिसांकडून चोप

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यातील शहरी भागांत कलम १४४ लागू होते. २२ आणि २३ मार्चला मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने शेवटी राज्यशासनाने ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला….

यवतमाळ येथे विलगीकरण कक्षात ६ जण भरती

स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या नागरिकांची संख्या ६ झाली आहे. त्यांपैकी ३ जण कोरोनाबाधित असून उर्वरित ३ जण निगराणीखाली आहेत.

‘होम क्वारंटाइन’ सांगितलेल्यांवर पोलिसांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे लक्ष

‘होम क्वारंटाइन’ सांगितलेले लोकही घराबाहेर पडून अन्यत्र फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. कल्याण-डोंबिवली पोलीस ‘व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत.

कोरोना साथीमुळे नांदापूर (जिल्हा हिंगोली) गावात नवीन व्यक्तींना प्रवेशबंदी

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शहरी भागासमवेतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात असून जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील गावकर्‍यांनी नवीन व्यक्तींना गावात प्रवेशबंदी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सामाजिक योगदान द्यावे ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचा संसर्ग हे जागतिक संकट असून त्याचा संसर्ग थांबवणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक आस्थापन आणि कारखाने यांनी कामगारांना घरी थांबण्याच्या सूचना द्याव्यात.