‘होम क्वारंटाइन’ सांगितलेल्यांनी घरी थांबून सर्व सूचनांचे पालन करणे, हे एक प्रकारे त्यांचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे. सूचना न पाळणार्यांनी ‘स्वत:मुळे पोलीस आणि शासकीय यंत्रणा यांचा वेळ वाया जात आहे’, याचे भान ठेवणे आवश्यक आहे !
कल्याण, २४ मार्च (वार्ता.) – ‘होम क्वारंटाइन’ सांगितलेले लोकही घराबाहेर पडून अन्यत्र फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. कल्याण-डोंबिवली पोलीस ‘व्हॉट्सअॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत. या ‘व्हिडिओ कॉल’च्या साहाय्याने पोलीस ती व्यक्ती घरी आहे का ? तिच्या घराच्या दारावर लावलेली ‘होम क्वारंटाइन’ची पाटी हे सगळे तपासत आहेत. या व्यक्तीला धीर देऊन त्याला कुठल्या गोष्टींची आवश्यकता भासल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचा संदेश देण्यात येत आहे. संबंधितांनी ‘कॉल’ उचलला नाही, तर त्यांच्या घरी जाऊन निश्चिती केली जात असल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.