यवतमाळ येथे विलगीकरण कक्षात ६ जण भरती

जिल्ह्यात ‘होम क्वारंटाइन’ची संख्या १५०

यवतमाळ, २४ मार्च (वार्ता.) – येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या नागरिकांची संख्या ६ झाली आहे. त्यांपैकी ३ जण कोरोनाबाधित असून उर्वरित ३ जण निगराणीखाली आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कांबळे यांनी सांगितले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या संदर्भात जिल्ह्यात ‘होम क्वारंटाईन’ असलेल्यांची संख्या १५० झाली आहे. यात विदेशातून आलेले ११६ जण, त्यांच्या थेट संपर्कात आलेले २३ जण, तसेच पुणे, मुंबई आणि अन्य शहरांतून आलेले ११ नागरिक आहेत.