Soft Target SANATAN SANSTHA : (म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असून तिच्यावर बंदी आणा !’ – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जावईशोध

पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अर्ज केला, तेव्हा केंद्रामध्ये काँग्रेसचेच सरकार होते, मग सनातन संस्थेवर बंदी का घालण्यात आली नाही ? याचे उत्तर काँग्रेसनेच द्यावे.

छत्रपती संभाजीनगर येथे २५ ठिकाणी इ.व्ही.एम्. यंत्रे बंद !

प्रशासनाकडून मतदान यंत्रांची पडताळणी करण्यात येत नाही का ?

मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची पुनश्च टीका !

काँग्रेसने तिच्या ६० हून अधिक वर्षांच्या सत्ताकाळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का दिला नाही ? याचे उत्तर जयराम रमेश यांनी आधी दिले पाहिजे.

निवडणूक अधिकार्‍यांनी पैसे खाल्ले का ?- मनसेचा गंभीर आरोप

निवडणूक अधिकार्‍यांनी याविषयी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !

१९ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या निषेधार्थ सांगलीत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोर्चा !

यासाठी भाजपचे आमदार श्री. नितेश राणेही उपस्थित रहाणार आहेत. हा मोर्चा सायंकाळी ५ वाजता झुलेलाल चौक येथून प्रारंभ होईल. दीनानाथ चौक, मारुति चौक, बालाजी चौक, कापडपेठ, स्टेशन चौक मार्गे जाऊन राममंदिर येथे त्याचे सभेत रूपांतर होईल.

मुंबई, ठाणे, रायगड येथे धुळीसह सोसाट्याचा वारा आणि पाऊस !

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील २४ घंट्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

मुंबई विमानतळावर ९ सहस्र ६१० ग्रॅम सोन्यासह चौघांना अटक !

सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन भिन्न कारवायांध्ये ९ सहस्र ६१० ग्रॅम सोन्यासह चौघांना अटक केली. त्यात केनिया देशाच्या रहिवासी असलेल्या तीन महिलांचा समावेश आहे.

पुणे येथे मतदान केंद्र परिसरात काँग्रेसचे फलक असल्यामुळे भाजपचे आंदोलन !

फडके हौद परिसरात भाजपच्या पदाधिकार्‍यांनी मतदान केंद्राच्या परिसरात काँग्रेसचे फलक असल्याने आक्षेप घेत रस्त्यावर आंदोलन केले.

साजणीतील अवैध फटाका कारखान्यावर धाड

पोलिसांनी अधिक पडताळणी केली असता त्यांना या कारखान्याच्या जवळच असलेल्या अन्य एका साठाकेंद्रात मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियिम पावडर, अर्धा पोते गंधक, वजनकाटा, लोखंडी चाळणी आणि फटाके आढळून आले.

‘मतदार सूचीतील नाव वगळले गेल्यास संबंधितांना मतदान करता येणार’ हा संदेश चुकीचा !

हा संदेश प्रसारित करणार्‍या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू केल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. मतदानाच्या संदर्भात चुकीचा संदेश किंवा अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणीही प्रशासनाने दिली आहे.