छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीच्या चौथा टप्प्यातील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या प्रारंभी जिल्ह्यातील तब्बल २५ ठिकाणी इ.व्ही.एम्. यंत्रे बंद पडली; मात्र काही वेळाने यंत्रे पालटल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. (प्रशासनाकडून मतदान यंत्रांची पडताळणी करण्यात येत नाही का ? – संपादक)
छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरातील चाटे स्कूल या मतदान केंद्रांवर सकाळी इ.व्ही.एम्. यंत्र बंद असल्यामुळे मतदारांना रांग लावावी लागली. यामुळे काही मतदार मतदान न करताच पुन्हा घरी गेल्याचे दिसून आले. काही वेळाने मतदान यंत्रे पालटण्यात आली. त्यानंतर येथील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली; मात्र तोपर्यंत मतदानाला अडथळा निर्माण झाला होता. सातारा परिसरासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २५ मतदान केंद्रावर इ.व्ही.एम्. यंत्रे बंद पडल्याने मतदानात काही काळ अडथळा निर्माण झाला होता.