आषाढी पायी वारीचे २९ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान !

आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची पंढरपूर येथे पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी आषाढी पायी वारी यंदा २९ जून या दिवशी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

भाविकांच्या अलोट गर्दीत आणि अपार उत्साहात झाला श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव सोहळा !

वर्ष १८२४ पासून हा रथोत्सव चालू आहे. हा रथोत्सव भक्ती आणि शक्तीचा उत्सव मानला जातो. चैत्र पौर्णिमेला जोतिबा येथील यात्रा झाल्यावर प्रत्येक वर्षी हा रथोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.

धर्मांध पोलिसाच्या फितुरीमुळे अमली पदार्थाच्या तस्कराला लाभ !

धर्मांधांना पोलीस किंवा सैन्य यांमध्ये नोकरी देणे किती घातक आहे, हे लक्षात घ्या !

सिंधुदुर्ग : पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना ५ मास वेतन नाही

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या भोंगळ कारभारामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी या प्रश्नी कामगार न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे.

पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षारक्षकांना मारहाण !

पूर्वीही मारहाण केली म्हणून केले होते निलंबित !

मोरगाव (बारामती) येथील ‘महावितरण’च्या महिला कर्मचार्‍याची कोयत्याने १६ वार करून हत्या !

सरकारी कार्यालयात उघड उघड कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा !

पुण्यातील ज्‍योतिषाचार्य अतुल छाजेड अंनिसचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज !

कुणी आव्हाने स्वीकारली की, शेपूट घालून पळणारी अंनिस याही वेळी वेगळे काही करणार नाही !

पुणे येथील पंतप्रधान मोदी यांची सभा ‘रेस कोर्स’ मैदानावर !

पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या ४ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा आयोजित केली आहे. सभेला येणार्‍या गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभास्थळामध्ये पालट करण्यात आलेला आहे.

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ २७ एप्रिलला पंतप्रधानांची कोल्हापुरात जाहीर सभा ! – राजेश क्षीरसागर

या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील इतर मंत्री उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे २७ एप्रिलला कोल्हापुरात महायुतीचे भगवे वादळ घोंगावणार आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिल या दिवशी गणपति मंदिराजवळ आयोजित केलेल्या ‘नमो संवाद’ कोपरा सभेत ते बोलत होते.