(म्हणे) ‘गोमांसाची टंचाई निर्माण करून गोव्यातील धार्मिक सलोखा भाजप बिघडवत आहे !’

कर्नाटकच्या विधानसभेने ‘कर्नाटक पशूधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन’ हे गोहत्याबंदी विधेयक संमत केल्याने गोव्यातील काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांना पोटशूळ उठला.

पू. विनयानंदस्वामी यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

पू. विनयानंदस्वामी यांनी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली आणि आश्रमात चालू असलेले राष्ट्र, धर्म अन् आध्यात्मिक संशोधन यांविषयीचे कार्य जाणून घेतले. पू. स्वामींचा एक आश्रम आणि कालिमातेचे मंदिर आहे.

आयुर्वेदीय वैद्यांना शस्त्रक्रिया करण्यास अनुमती दिल्याच्या निषेधार्थ आयोजित ‘भारत बंद’मध्ये ‘आय.एम्.ए.’च्या गोवा विभागाचा सहभाग

केंद्राने पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आयुर्वेदीय वैद्यांना शस्त्रक्रिया करण्यास अनुमती दिल्याच्या निषेधार्थ आयोजित ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आय्.एम्.ए.) पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये ‘आय्.एम्.ए.’च्या गोवा विभागाने सहभाग घेतला.

गोव्यात अवेळी पाऊस

१० डिसेंबरच्या रात्री गोव्यात बहुतेक भागात अवेळी पाऊस पडला. यामध्ये जुने गोवे येथे ५ सें.मी., फोंडा आणि सांगे येथे प्रत्येकी ४ सें.मी., दाबोळी येथे ३ सें.मी, पणजी आणि काणकोण येथे २ सें.मी. अन् केपे येथे १ सें.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा पंचायतीची आज निवडणूक

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या एकूण ४८ मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षपातळीवर लढवली जात आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगोप, आप आदी महत्त्वाचे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

गोव्यात दिवसभरात १०४ नवीन कोरोनाबाधित

गोव्यात सलग दुसरा दिवस कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. दिवसभरात १०४ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर १३० रुग्ण बरे झाले.

एका विवाह सोहळ्यामुळे गोव्यात १०० जण कोरोनाबाधित

गोव्यात एका विवाह सोहळ्यामुळे १०० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन करावे, असे आवाहन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

२ डिसेंबर या दिवशी होणार्‍या जि.पं. निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. राज्यातील ४८ मधील ४१ जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला पाठिंबा; मात्र कोळसा वाहतुकीला विरोध ! – सुदिन ढवळीकर, मगोप

राज्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला मगोपचा पाठिंबा आहे; मात्र कोळसा वाहतुकीला विरोध आहे, असे मत मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे राज्याला लाभ होणार असल्याचा दावा आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी या वेळी केला आहे.

दाबोळी विमानतळ उड्डाणक्षेत्रातील अनधिकृत मदरशावर कारवाई करा ! – स्थानिकांची उपजिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

दाबोळी विमानतळ उड्डाणक्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.