गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे १ मृत्यु
आज गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर ११२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
आज गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर ११२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कवळे, फोंडा येथील दत्तमंदिराच्या वतीने श्रीदत्तगुरूंच्या उत्सवमूर्तीची पालखी चारचाकी वाहनातून काढण्यात आली.
कळंगुट समुद्रकिनार्यावर मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधीचे दक्षतेचे उपाय पर्यटक करत नसल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काणकोण येथे ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत १६ जण इंग्लंड येथून काणकोण येथे आले आहेत आणि यामधील ५ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने दोनापावला येथे धाड टाकून मुंबईस्थित स्ट्रोमे कॅनडी आणि व्हेलेंटाईन परेरा, तसेच भाग्यनगरस्थित आयन अली खान यांना ८ लाख ५० सहस्र रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह कह्यात घेतले आहे.
मार्ली हा काणकोण तालुक्यातील अत्यंत मागास भागातील वाडा असून येथील विद्यार्थी, आजारी आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना येथील खड्डेमय रस्ता आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव यांमुळे पुष्कळ त्रास होतात.
राज्यातील पंचायतींना १ जानेवारीपासून समान ‘कॅडर’ लागू केला जाणार आहे. यामुळे पंचायत संचालकांना एका पंचायत कार्यालयातील कर्मचार्याला दुसर्या पंचायत कार्यालयात स्थलांतर करणे शक्य होणार आहे.
नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य तथा केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक यांनी सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांच्या विरोधात पणजी पोलीस, सायबर गुन्हे विभाग आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्यालय यां ठिकाणी तक्रार नोंदवली आहे.
सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिरात ३० डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे आणि साथी कलाकार यांच्या नामस्मरणाचा कार्यक्रम होणार आहे.
सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे विशेषत: शाळकरी मुलींचे अपहरण करण्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. या ८ प्रकरणांमधील ६ घटनांचा पोलिसांनी छडा लावला आहे, तर उर्वरित २ प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे. अन्वेषण चालू असलेली प्रकरणे चालू मासातच नोंद झाली आहेत.