अंगावर पित्त उठून खाज येत असल्‍यास घरगुती उपाय

अंगावर पित्त उठून खाज येत असल्‍यास चमचाभर खोबरेल तेलात किंवा कोणत्‍याही खाद्य तेलात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा असे एकत्र मिसळून हे तेल खाज येणार्‍या भागी लावावे. याने खाज येणे लगेच थांबते.

बहुगुणी शेवग्‍याच्‍या झाडाची लागवड करा !

आताच्‍या काळात शेवग्‍याच्‍या फांद्या लावल्‍या, तर त्‍यांना मुळे फुटतात. आवश्‍यकतेनुसार कृषीसंबंधी जाणकाराचे मार्गदर्शन घेऊन प्रत्‍येकाने आपल्‍या परिसरात शेवग्‍याचे न्‍यूनतम एक झाड लावावे. आपत्‍काळासाठी हे झाड पुष्‍कळ उपयुक्‍त आहे.

होमिओपॅथी उपचाराचे लाभ आणि ‘स्‍वउपचारा’विषयी मार्गदर्शक सूत्रे

‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची नवीन लेखमाला !

ताप आलेला असतांना मोड आलेली कडधान्‍ये, दूध यांसारखा पचायला जड असलेला आहार टाळावा !

‘ताप आलेला असतांना सहजपणे पचणारा आहार हवा. मोड आलेली कडधान्‍ये, दूध, दही, काकडी, बटाटा, बीट, रताळी, सुरण यांसारख्‍या कंदभाज्‍या, फळे, तसेच विविध कोशिंबिरी हे सर्व पदार्थ पचायला जड असतात.’

प्रतिदिन शिळे अन्‍न खावे लागत असेल, तर जेवण थोडे अल्‍प बनवावे

नेहमी उरलेले अन्‍न शीतकपाटात ठेवून पुन्‍हा गरम करून जेवणे योग्‍य नव्‍हे. कधीतरी असे केल्‍यास चालू शकते; परंतु प्रतिदिन असे करू नये. एक वेळ अन्‍न थोडे कमी जेवल्‍यास चालू शकते; पण प्रतिदिन शिळे खाऊ नये. यासाठी आवश्‍यक तेवढेच अन्‍न बनवावे.

वर्षाचे बाराही मास मातीच्‍या मडक्‍यातील पाणी पिणे चुकीचे

उन्‍हाळा आणि शरद ऋतू सोडून अन्‍य वेळी मातीच्‍या मडक्‍यातील पाणी पिऊ नये. या काळात स्‍टील किंवा कलई केलेले तांबे-पितळ यांच्‍या भांड्यातील पाणी प्‍यावे.’

होमिओपॅथी चिकित्‍सापद्धतीची ७ मूलभूत तत्त्वे !

‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची नवीन लेखमाला !

सोफ्‍याचा वापर पाहुण्‍यांसाठीच करावा !

‘घरात सोफा असला, तरी स्‍वतः त्‍यावर कधीही बसू नये. सोफ्‍याचा वापर केवळ पाहुण्‍यांना तात्‍पुरते बसण्‍यासाठी करावा. ज्‍यांच्‍याकडे सोफा नाही, त्‍यांनी हे विकतचे दुखणे घरी न आणलेलेच चांगले. त्‍याऐवजी खुर्च्‍या वापराव्‍यात.’

अम्‍लपित्ताच्‍या त्रासासाठी जीवनशैलीत पालट करणे अत्‍यावश्‍यक !

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, म्‍हणजे रुग्‍ण आपल्‍या आहार विहारामध्‍ये काहीच पालट करत नाही. त्‍यामुळे अम्‍लपित्ताचा त्रास वारंवार होत रहातो. प्रारंभीला पित्त वाढवणारा आहार घेतल्‍यासच अम्‍लपित्ताचा त्रास होतो. कालांतराने काहीही खाल्ले, तरी अम्‍लपित्त व्‍हायला लागते !

सूज आणि ठणका यांवर उपयुक्‍त एरंडेल तेल

‘काही वेळा काटा लागल्‍यावर त्‍या भागाला सूज येते आणि तेथे ठणकू लागते. गळू किंवा केसतोड झालेला असतांनाही सूज आणि ठणका असतो. अशी सूज आणि ठणका असतांना एरंडेल तेल पुष्‍कळ चांगले काम करते.