प्रतिदिन शिळे अन्‍न खावे लागत असेल, तर जेवण थोडे अल्‍प बनवावे

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २३०

‘प्रतिदिन शिळे अन्‍न खाल्‍ल्‍याने शरिरातील अग्‍नी (पचनशक्‍ती) मंद होतो. त्‍यामुळे खाल्लेले अन्‍न नीट पचत नाही आणि विविध रोग होतात. नेहमी उरलेले अन्‍न शीतकपाटात ठेवून पुन्‍हा गरम करून जेवणे योग्‍य नव्‍हे. कधीतरी असे केल्‍यास चालू शकते; परंतु प्रतिदिन असे करू नये. एक वेळ अन्‍न थोडे कमी जेवल्‍यास चालू शकते; पण प्रतिदिन शिळे खाऊ नये. यासाठी आवश्‍यक तेवढेच अन्‍न बनवावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.८.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan